जेऊर
किसन कांबळे (MCJ) सर 9970381507

“ग्राम सुधार समिती” करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या जिव्हाळा ग्रुप, करमाळा तालुका यांचा स्नेह मेळावा रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजता आनंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, सभागृह भारत महाविद्यालयाशेजारी, जेऊर, ता. करमाळा आला होता. गीत कविता विनोद चर्चासत्र मा. मनोज राऊत गटविकास अधिकारी (वर्ग–१) यांचे “माणुसकीचे नाते” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान झाले . यावेळी काही गुणवंतांचा सन्मान देखील करण्यात आला.
छत्रपती शिवाजीराजे यांचे शूर सरदार, सरसेनापती संताजी राजेघोरपडे यांचे वंशज, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संजयकुमार राजेघोरपडे उपस्थित होते.
करमाळा नगर परिषदेचे मा नगरसेवक श्रेणीक खाटेर , विठ्ठलराव भणगे, भा ज पा चे मा.जिल्हा सरचिटणीस, काडवाण कविता संग्रहाचे कवी प्रकाश तात्या लावंड, अंनिस चे अनिल माने, मा प्राचार्य नागेश बापू माने, मराठा सेवा संघ,करमाळा तालुका अध्यक्ष, मेडिकल असोसिएशन चे तालुका अध्यक्ष सचिन साखरे, गुळसडी येथील उद्योजक गायकवाड यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजीराजे यांचे शूर सरदार, सरसेनापती संताजी राजेघोरपडे यांचे वंशज, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संजयकुमार राजेघोरपडे यांचे सुपुत्र शंभूराजे यांना कार्यक्रम संपल्या नंतर घरी जाऊन वाढदिवसानिमित्त यांना सत्कार करून शुभेच्छा दिल्या. शंभूराजे सध्या पुणे येथे मोटेगावकर यांचे कॉलेज ला बारावी सायन्स ला शिक्षण घेत आहे त्याचा वाढदिवस 12 जानेवारी ला असल्यामुळे या मान्यवरांनी खास घरी जाऊन शुभेच्छारूपी आशिर्वाद दिले.
भारत शिक्षण संकुलाचे प्राचार्य आबासाहेब सरोदे सर, शिक्षक, तसेच पोलिस मित्र संघटनेचे राज्य संघटक विष्णुपंत आंधळकर, सर्व पोलीस मित्र पदाधिकारी, जिल्हा परिषद केंद्र शाळा देवळाली चे मुख्याध्यापक भैरू गभाले, सागर साखरे सर, शिवस्वराज्य संस्थेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष माधव सूर्यवंशी सोलापूर जिल्हा कामगार सेनेचे जिल्हाअध्यक्ष अमोल अश्रू जाधव, तालुका अध्यक्ष दादासाहेब तनपुरे, करमाळा तालुका मराठा सेवा संघाचे सचिन काळे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किसन कांबळे आदींनी शंभूराजे राजेघोरपडे यास आशिर्वाद दिले.
उपस्थितांचा सत्कार व सन्मान संजयकुमार राजेघोरपडे यांनी फेटा हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करून आभार मानले.
