
कुगाव ता. करमाळा
कुगाव ता. करमाळा हे गाव पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडले जावे यासाठी उजनी बॅकवॉटर परिसरातून जोडपूल व्हावा या दृष्टीने सन २०१९ पासून मा ना अजितदादा पवार साहेब यांच्याकडे बारामती व पुणे येथे सातत्यपूर्ण सकारात्मक पाठपुरावा करण्यात आला.
उजनी बॅकवॉटर परिसरातून सुमारे ४०० कोटी रुपयांचा जोडपूल ही अनेकांना अशक्यप्राय वाटणारी बाब होती. त्यावेळी मी दिनांक ११/१२/२०१९ रोजी कुगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २६/०१/२०२० रोजी झालेल्या ग्रामसभेत या विषयाचा ठराव एकमताने मंजूर करून शासकीय पातळीवर अधिकृत पाठपुराव्यास सुरुवात केली.
मात्र मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे राज्यातील बहुतांश निधी आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आला.
त्या कठीण काळात मा ना अजितदादा पवार साहेब यांनी “तुझ्या पुलाचा विषय योग्य वेळी मार्गी लावेन” असा शब्द दिला आणि त्यांनी तो शब्द पाळला.
कुगाव ते इंदापूर जोडपुलाला विधानसभेत मंजुरी मिळवून देत दि २३/०८/२०२४ रोजी स्वतः उपस्थित राहून या जोडपुलाचे उद्घाटन केले. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी जोडपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करून देण्यात आले.
शब्द दिल्यावर अशक्यप्राय वाटणाऱ्या बाबीही प्रत्यक्षात उतरवणारे विकासाचा ध्यास घेतलेले आणि सामान्य जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारे मा ना अजितदादा पवार साहेब यांचे नाव या उजनी जलाशयातील कुगाव – शिरसोडी पूलास अजितदादा पवार यांचे नाव देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात यावी अशी मागणी सौ तेजस्विनी दयानंद कोकरे मा सरपंच ग्रामपंचायत कुगाव ता करमाळा यांनी केली आहे.
