February 19, 2026

किसन कांबळे (MCJ) सर 9970381507

उजनी धरण २०१८-२०१९ साली -५९% (वजा ५९%) तर २०२३-२०२४ साली -६१% (वजा ६१%) पर्यंत गेले होते अन् आता तर दरवर्षीच मायनस मध्ये जात आहे. उजनी धरणात प्रचंड गाळ व गाळमिश्रीत वाळू असल्याचे दिसून येत आहे.

उजनी धरणात ९९ कोटी ब्रास ६४,३५० कोटी रूपयाची वाळू; तर ६० कोटी ब्रास गाळ आहे. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सध्या वाळूचा ६५० रू ब्रास दर असून याच हिशोबाने उजनी धरणात ९९,००,००,००० ब्रास वाळू (९९ कोटी ब्रास) × ६५० रू १ ब्रास वाळूचा शासकीय दर गृहीत धरला तर या वाळूचा शासकीय दर ६४३५०,००,००,००० रू (६४३५० कोटी रू) होत आहे. या पैशातून उजनी धरण व बॅकवाॅटर परिसरातील अपुर्ण राहिलेले सर्व प्रकल्प पुर्ण होण्यास मदत होणार आहे असे मत प्रगतशील शेतकरी धूळाभाऊ कोकरे यांनी मांडले आहे.

सध्या चालू असलेले पुलाचे बांधकाम

उजनी धरण व बॅकवाॅटर परिसरातील गाळ अतिशय उच्च प्रतीचा असून हा गाळ शेतकरी बांधवांना दिल्यास शेतीतील निर्यातक्षम केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल त्यामुळे परकीय चलन वाढण्यास मदत होईल तसेच हा गाळ व गाळमिश्रीत वाळू काढण्याने उजनी धरणातील पाणी साठवण क्षमता २० TMC+ वाढण्यास मदत होणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *