February 19, 2026
IMG-20251222-WA0046

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये देवळाली शाळेचे घवघवीत यश

किसन कांबळे (MCJ) सर 9970381507

देवळाली शाळेचा इयत्ता चौथी चा विद्यार्थी  प्रज्वल धनंजय गोसावी याने माढा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये 200 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक पटकावून देवळाली केंद्राचे तसेच करमाळा तालुक्याचे नाव जिल्ह्यामध्ये गाजवलं आहे.

त्याबद्दल प्रज्वल वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याला मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती डोईफोडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले आहे.

यावेळी पालक धनंजय गोसावी उपस्थित होते.

     जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देवळाली चे मुख्याध्यापक बहीरु गभाले व शिक्षक बंधू भगिनी आणि केंद्रप्रमुख राजकुमार खाडे विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले गटशिक्षणाधिकारी नितीन कदम यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *