किसन कांबळे (MCJ) सर 9970381507

कुगाव ता करमाळा जि सोलापूर हे उजनी बॅकवॉटर मधील एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आणि तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेले गाव आहे.
इंदापूर शहर केवळ ९ किमी अंतरावर असले तरी कुगाव वासीयांना तिथे पोहोचण्यासाठी तब्बल १०० किमीचा वळसा घालावा लागत होता.
हा वळसा म्हणजे केवळ अंतर नव्हते; तो होता शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ, शेतीचे व्यवहार आणि संधींमधील अडसर !
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे फक्त एकच कुगाव ते शिरसोडी जोडपूल…
कुगाव च्या सरपंच पदावर कार्यरत असताना सौ तेजस्विनी दयानंद कोकरे यांनी कुगाव पंचक्रोशीला इंदापूर जोडपुलाचे स्वप्न दाखवून शासन दरबारी कुगाव ते शिरसोडी पूलाची मागणी करून अधिकृत शासकीय पाठपुराव्यास सुरुवात केली अन् विविध पातळ्यांवर धावपळ चालू केली…
परंतु या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग दिला तो मा ना दत्तात्रय मामा भरणे आमदार इंदापूर तथा तत्कालीन पालकमंत्री सोलापूर यांनी…
कुगाव ते शिरसोडी या जोडपुलाच्या मंजुरी पासून कामाच्या सुरुवातीपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेला निर्णायक वळण दिले ते मा ना अजितदादा पवार साहेब यांनी.
