
जि .प .प्रा.शाळा पांडे येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना संजू कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी प्रतिमा पूजन गावातील ज्येष्ठ सर्वच सामाजिक .शैक्षणीक. पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपसरपंच नितिन निकम , अनिल अनारसे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिनिधी सौ. अनिता रामदास भोसले ताई अभिजीत वीर सुनील भोसले महादेव भोसले रमेश भोसले दस्तगीर मुजावर विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत शुद्ध पाणी पुरवठा धारक – अमर दादा मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले इ . १ली ते ८वी तील प्रथम क्र प्रत्येकी १ ते 3 याप्रमाणे २४ स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावले.
प्रत्येकी वही /पेन /पेन्सिल /खोडरबर व ट्रॉफीसह बक्षीसवितरण मा नितिन निकम उपसरपंच यांच्या सौजन्याने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद श्रीमती . विजया थोरात ज्योति राऊत सविता झुंजकर राणी घोलप लंका साळुंके मंजुषा सानप यांनी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण आयोजन केले .
प्रास्ताविक मुख्याध्यापक संजू जालिंदर कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळासाहेब वाघमोडे सर यांनी
मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
