महेश वैद्य हे श्री समीर जी साठा आणि शक्तिमान जी तलवार साहेब यांचे गेली 25 वर्षा पासून फिटनेस कोच म्हणून कार्यरत आहेत…
त्यांच्या माध्यमातून दोन दिग्गजांची भेट जुळूनआली…
समीर जी साठा यांचे उद्योग क्षेत्रात मोठे नाव आहे महेश वैद्य यांना त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे…
शक्तिमान जी तलवार यांच्या सानिध्यात राहून जीवनातील बऱ्याच गोष्टी शिकता आल्या, त्यानिमित्ताने बऱ्याच दिग्गज लोकांच्या सहवासात राहण्याचा संबंध आला त्यामध्ये पद्मश्री कै. मनोजकुमारजी यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले , शक्तिमान जी तलवार यांच्या माध्यमातून लिविंग लिजेंड सुपरस्टार सनी देओल, निर्माता निर्देशक, श्री अनिल शर्मा जी गदर एक प्रेम कथा आणि गदर2 फेम निर्देशक तसेच निर्माते प्रसन्न कपूर जी (लिविंग लिजेंड सुपरस्टार जितेंद्र जी यांचे भाऊ…यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.
गुरुवर्य विनोदकुमार गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य अडचणीवर मात करता आली..या जडणघडणी मध्ये करमरकर हेल्थ स्पा चे प्रमुख संस्थापक डॉ. भारत जी करमरकर साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि मुंबईतील पहिली नोकरी फिटनेस ट्रेनर म्हणून काम करण्याची संधी मला करमरकर सर यांनी दिली..त्यांचे सुपुत्र सचिन करमरकर यांच्या सोबत खूप व्यायाम केला पावर लिफ्टिंग, वेट लिफ्टिग स्पर्धेत भाग घेणे खूप चांगला बेस तयार झाला..
शिवछत्रपती अवॉर्ड विनर आदरणीय गुरुवर्य मधुकर दरेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंग आणि पावर लिफ्टिंग स्पर्धेत खूप यश मिळवले..
मित्रवर्य प्रशांत पालकर नितीन काळसेकर, शुभ चिंतक श्री विलासराव भोसले अण्णा..
विशेष सहकार्य श्री. सचिन जी सरदेसाई, आदरणीय हरीश जी मणियाल..तसेच डॉ. हेमंत कुलकर्णी आदरणीय रश्मिन भाई ठाकर,नितीन जी शेट्टी,तसेच महेश दोशी, बाळासाहेब होशिंग, भाऊसाहेब फुलारी, अभिजित कांबळे ,मोरे अण्णा , डॉ.श्रीराम परदेशी ॲड.अजय दिवाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच ज्ञात अज्ञात व्यक्तीचे नातेवाईक यांचे खूप सहकार्य मिळाले.
नशा मुक्त भारत आणि सशक्त भारत अभियान राबविताना आमचे मित्रवर्य समाजसेवक किसान कांबळे सर यांचे खूप मोठे सहकार्य लाभले.
भविष्यात एकच उद्देश डोळ्यासमोर आहे तो म्हणजे आपल्या देशाला उच्च स्थानावर नेण्यासाठी नशा मुक्त समाज आणि सचक्त समाज हे होणे काळाची गरज आहे. डिजिटल व्हिजन असणारे मित्र श्री परमिंदर सिंग उर्फ प्यामसिंग हे चांगली साथ देतात
येणारी भावी पिढी ही सशक्त आणि नशा मुक्त असणे देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे आणि त्यावरच सध्या काम सुरू आहे आणि जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत या कार्यास वाहून घेण्याचा दृढ संकल्प केला आहे आई वनमाला बबनराव वैद्य चे आशीर्वाद आणि प्रेरणा घेऊन जीवनात वाटचाल सुरू आहे अशी भावना श्री महेश वैद्य यांनी पत्रकार समाजसेवक किसन कांबळे सर यांच्या सोबत बोलताना व्यक्त केली..
आमचे मित्र कै. दिनेश भाऊ सोरटे यांचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले त्यांच्या जाण्याने मित्रत्वाचा ओलावा हरपला त्यांची आठवण कायम स्मरणात राहील.
विशेष म्हणजे आय एम एस इंटरनॅशनल स्कूल चे सर्वेसर्वा श्री अमोलजी जोशी सर यांचे खूप मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे सरांना माझ्याबद्दल असलेली आपुलकी ही शब्दात व्यक्त करता येत नाही.
तसेच प्रख्यात जलविख्यात एस्ट्रोलॉजर पंडित सुभाषित राज यांच्या माध्यमातून श्री अनुप जलोटा जी ,तसेच कळंब चे श्री अरविंद शिंदे सर यांचे सहकार्य लाभले तसेच आमचे मार्गदर्शक लातूरचे आमचे सर्वांचे लाडके श्री रमेशजी गणाचार्य, (नाना)स्वामी सर यांचा सहवास लाभतो आहे..
सर्वांचे आभार आणि धन्यवाद..

