June 2, 2026

बदलापूर मुंबई…

किसन कांबळे (MCJ) सर 9970381507

नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसिडर आणि नशा मुक्त महाराष्ट् सशक्त आणि सक्षम महाराष्ट्र नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे प्रचारक व प्रसारक (महाराष्ट्र राज्य) महेश वैद्य यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) मा. नामदार आशिष दामले यांची बदलापूर येथे सदिच्छा भेट घेतली.


नशा मुक्त आणि सशक्त सक्षम महाराष्ट्र होण्यासाठी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्र भर प्रचार व प्रसार करण्यासंबंधी निवेदन दिले.


समाजाला उपयुक्त असे हे दोन्ही उपक्रम आपल्या महामंडळाच्या मार्फत घेण्याच्या मानस मा. महेश वैदय यांनी व्यक्त केला. समाजाने आत्तापर्यंत अनेक प्रबोधनकार दिले आहेत आणि आपल्या अफाट कर्तुत्वाने स्वातंत्र्य संग्रामात आहुती दिल्या आहेत. अशा समाजाचा आपण वारसा सांगतो.
समाज जीवनात वावरताना दुर्दैवाने असे निदर्शनास येते की ज्यांना सामाजिक हित कशात आहे आणि ते कसे करावे हे समजत नाही आणि अशा काही लोकांच्या मनमानी कारभारामुळे समाजाला नाहक बदनामीला समोर जावे लागत आहे असे मत महेश वैद्य यांनी पुढे बोलताना व्यक्त केले.

परशुराम महामंडळाचे अध्यक्ष मा. ना. आशिष जी दामले
हे कर्तुत्वान नेतृत्व आपल्या समाजाला लाभले आहे. त्यांच्याकडे वैयक्तिक हिताचे काम न घेऊन जाता समाजाला उपयुक्त असे काम करून घ्यावे मा. ना. दामले नक्कीच सहकार्य करतील.


महेश वैद्य हे गेली तीस वर्षापासून सामाजिक जीवनात काम करत आहे. करोना काळानंतर ग्रामीण भागामध्ये सामाजिक भान जपत फिटनेस कॅम्पचे आयोजन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ग्रामीण भागातील शाळा हायस्कूल कॉलेज ग्रामपंचायती जिम इत्यादी ठिकाणी उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले. परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत हे उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र राबविण्याचा मानस आहे आणि त्याला माननीय अध्यक्ष मा. ना. आशिष जी दामले नक्कीच मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.


सामाजिक कार्य हे रक्तात असावे लागते आणि त्यामागे काम करण्याची इच्छा तळमळ उर्मी लागते. काही लोकांनी समाज कार्य करत असताना समाजासाठी फ्री कॅम्प आयोजित करत असताना टिंगल टवाळी केली , टोमणे मारले पण या सर्वातून संघर्षातून बरेच काही शिकता आलेल्या अनुभवाबद्दल महेश वैद्य भावूक झाले होते.

 परशुराम महामंडळाचे अध्यक्ष मा. ना. दामले
त्यांच्याकडून सकारात्मक काम करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले बद्दल महेश वैद्य ब्रँड ॲम्बेसेडर नशा मुक्त भारत अभियान सोलापूर जिल्हा प्रचारक व प्रसारक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी आवर्जून सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *