
किसन कांबळे (MCJ) सर 9970381507
करमाळा माणुसकीचा झरा जिवंत असल्याचा पुरावा सापडला म्हणून पोलीस मित्र संघटनेकडून कॉन्स्टेबल,आनंद पवार मेजर यांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला
रविवार 11 जानेवारी ला नगर हुन (सुपा) सोलापूर येथे एम. पी. एस. सी. परीक्षेस निघालेल्या आई , वडील व परीक्षार्थी मुलगी यांची इनोव्हा गाडी मांगी येथे पहाटे 4 वाजता अचानक बंद पडली. या परिवाराने 112 नंबर वर कॉल करून पोलीस मदत मागितली 112 नंबर गाडी गस्त मध्ये व्यस्त होती आणि मेजर आनंद पवार यांची ड्यूटीची वेळ संपलेली होती पण स्वतःच्या आरामाची पर्वा न करता त्यांनी अडचण समजून घेण्यासाठी प्रयत्न केले.
नेहमी मदतीचा हात पुढे करणारे करमाळा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे ज्यांना आनंद मेजर म्हणून ओळखले जाते ते आनंद भागवत पवार मेजर (करमाळा पोलीस) यांनी माहिती घेऊन स्वतःची शिफ्ट गाडी घेऊन मांगी येथे या गरजवंत परिवाराला कशाची ही अपेक्षा न धरता मदत केली.
घटनास्थळी विचारपूस करता समजले की मुलीला परीक्षेस सोलापूर या ठिकाणी योग्य वेळेत पोहोचणे क्रमप्राप्त आहे
आनंद मेजर यांनी वेळ न दवडता सकाळी 9 वाजता सोलापर येथे पोहोचण्यास या परिवारास जेऊर या ठिकाणी नेऊन पुढील व्यवस्था करून परीक्षेस रवाना केले
आनंद पवार मेजर (करमाळा पोलीस) यांनी वेळेवर केलेली अचूक मदत अतिशय मोलाची होती त्यांचे समाजातर्फे कौतूक होणे आवश्यक आहे.
अशा सकारात्मक गोष्टींना संजयकुमार राजेघोरपडे सर समाजासमोर मांडण्यास नेहमी पुढाकार घेतात. म्हणून या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे राज्य संघटक विष्णुपंत आंदळकर साहेब, पोलीस मित्र राज्य प्रमुख प्रतिनिधी संजयकुमार राजेघोरपडे यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून पोलीस मित्र जिल्हा अध्यक्ष अमोल अश्रू जाधव व पोलीस मित्र राज्य समन्वयक किसन कांबळे सर यांनी आनंद मेजर यांचा सन्मान ,सत्कार कार्यक्रम आयोजित करून सत्कार केल्याची माहिती पोलीस मित्र सतीश वीर यांनी दिली.
या प्रसंगी संजयकुमार राजेघोरपडे सर बोलताना म्हणाले की आनंद पवार मेजर (करमाळा पोलीस) यांच्या घराण्याचा वारसाच देशसेवेचा आहे. आनंद पवार पोलीस म्हणून भरती होण्यापूर्वी भारतीय सैन्यात सेवा बजावलेले कर्तव्यदक्ष जवान राहीले आहेत. आनंद पवार हे मूळचे जेऊर चे रहिवाशी असून भारत शिक्षण संकुलाचे विदयार्थी आहेत. घरातील वडील, चुलते, पुतणे यांनी पिढ्यानपिढ्या मिलिटरी च्या माध्यमातून देशसेवेच्या,देश उभारणीच्या कार्याला या परिवाराने हातभार लावलेला आहे
आनंद पवार मेजर (करमाळा पोलीस) यांनी जो माणुसकीचा हाथ दिला आहे, अश्या माणसांमुळेच मानवतेचा,माणुसकीचा झरा जिवंत आहे. हे सिद्ध होते.
माणुसकीचा हाथ देणाऱ्या माणुसकीच्या माणसांचा सन्मान सत्कार करणे पोलीस मित्र संघटनेचे कर्तव्य आहे पोलीस मित्र संघटना सर्वांना मित्र म्हणून सहकार्य करीत कार्यरत आहे असे उद्गार किसन कांबळे सर यांनी काढले.
आनंद पवार साहेबांचे पोलीस मित्र संघटनेतर्फे त्रिवार अभिनंदन संघटनेच्यावतीने शाल,फेटा,श्रीफळ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. त्याचवेळी आदित्य जाधव यांचाही वाढदिवसानिमित्त संजयकुमार राजेघोरपडे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या आनंद मेजर यांच्या कृतीयुक्त कार्याने समाजात माणुसकीचा मोरपीस रोवला आहे असे प्रकट उदगार संजयकुमार राजेघोरपडे सर यांनी अभिनंदन पर व्यक्त केले
पोलीस बांधवात आनंद पवार यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे जनमानसात कौतुक होते आहे
हा कार्यक्रम घडवून आणण्यास पत्रकार तुषार जाधव,पोलीस मित्र संतोष गोरे,आदित्य जाधव, यांनी मोलाचे सहकार्य केले.
