July 22, 2026

करमाळा

दिनांक 21 जून 2026

किसन कांबळे सर (MCJ) 9970381507

आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने प्राथमिक शाळा ढेरेवस्ती ता. करमाळा जि. सोलापूर येथे योगासनाचे प्रात्यक्षिक करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

हा उपक्रम राबविण्यात आणि अतिशय दुर्मीळ भागात योगा चा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सशक्त भारत अभियान चे ब्रँड अँबेसिडर विक्रम वीर करमाळा भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले महेश वैद्य यांनी यामध्ये मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक किसन कांबळे यांनी महेश वैद्य यांना निमंत्रित केले होते. ग्रामीण भागामध्ये वस्त्या शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्याकडून करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे असे मत प्रशिक्षक सशक्त भारत अभियानाचे सोलापूर जिल्हा नशा मुक्त भारत अभियान चे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील दुर्गम भागात अशा प्रकारचे उपक्रम राबविल्याने शाळेचे मुख्याध्यापक किसन कांबळे सरांनी महेश वैद्य यांचे आभार मानले.

“नशा मुक्त भारत – फिट भारत – सशक्त भारत” या ध्येयाने काम करणारे संस्थापक अध्यक्ष व सोलापूर जिल्हा नशा मुक्त भारत अभियानाचे ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांनी स्वतः उपस्थित राहून ग्रामस्थांना योग, प्राणायाम व बेसिक व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.

दुर्गम भागातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. “शरीर तंदुरुस्त तर व्यसन दूर” हा संदेश देत दररोज किमान 30 मिनिटे योगा करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

 महेश वैद्य पुढे बोलताना म्हणाले, “शहरांपुरता मर्यादित न राहता योगा खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. दुर्गम भागातील नागरिक शारीरिकदृष्ट्या सशक्त झाले तरच ‘सशक्त भारत’ घडेल.

महेश वैदय यांच्या समवेत संजय आण्णा मोरे आवर्जून उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *