
सोलापूर –
किसन कांबळे (MCJ) सर 9970381507
सोमवार दिनांक 27 रोजी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वतीने होऊ जनगणनेच्या कामासंदर्भातील शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना दिले. निवेदन जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी स्वीकारले. प्रमुख मागण्या पूढील प्रमाणे करण्यात आल्या आहेत .

*दिव्यांग शिक्षक* – हे काम एका ठिकाणी बसून करावयाचे नाही. शिवाय ते सदरचे काम अचूक करू शकणार नाहीत. म्हणून या दिव्यागांना वगळण्यात यावे.
©
*53+ शिक्षक* – 53 वर्षे वय पूर्ण झालेल्या शिक्षकांना त्यांची तब्येत साथ देत नसल्याने त्यांना वगळावी.
©
*दुर्धर आजारी शिक्षक* – अनेक शिक्षक हृदयरोग, कॅन्सर, किडनी फेल अशा विविध गंभीर आजाराने ग्रस्थ आहेत. अधिकच्या कामाचा भार त्यांच्यावर टाकल्यास त्याचा त्यांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून त्यांना या कामातून वगळण्यात यावी.
*महिला शिक्षिका*- सदरचे काम हे वाडी- वस्तीवर जाऊन करावयाचे असल्याने महिलांच्या गैरसोईची होऊ शकते. म्हणून महिलांना यातून वगळावी.
*बी. एल. ओ.*- बी एल ओ यांचे निरंतर काम असल्याने त्यांना यातून वगळावी.
. *मुख्याध्यापक* – शाळेचे मुख्याद्यापक किंवा मोठ्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यांना शाळेची काम अधिक असल्याने त्यांना या कामातून वगळण्यात यावी
यावेळी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक संघाचे महासचिव म.ज. मोरे, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष रणजीत थिटे, कार्यकारी अध्यक्ष सूर्यकांत हत्तुरे -डोगे, सहसचिटणीस श्रीकांत दळवी, संतोष जाधव, विठ्ठलशिंग राजपूत, उपाध्यक्ष इराण्णा मैंदर्गी, प्रमोद कुसेकर, दक्षिण संघाचे अध्यक्ष पंडित साबा, अंबादास वाघमारे, संतोष पवार, गुलाबराव वढते, मुत्याप्पा कोळी, शंकर नळे, धर्मराज तेली, मधुकर अहंकारी, राज पडदुणे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर लिंबोळे आदी शिक्षक संघांचे पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते अशी माहिती सुर्यकांत हत्तूरे – डोगे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सोलापूर जिल्हा शिक्षक संघ यांनी समाज माध्यमातून प्रसिद्धीस दिली आहे.
