July 23, 2026

करमाळा

किसन कांबळे (MCJ) सर 9970381507

9 जुलै 2026 गुरुवार रोजी शाळा बंद आंदोलना चा पहिला टप्पा आहे यात सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती यांचेकडून महाराष्ट्रातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शिक्षण संस्था यामधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा यांना करण्यात आले आहे. हे शाळा बंद आंदोलन गुरुवार 9 जुलै 2026 ला यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षक संघटनेच्या प्रमुख मागण्या पूढील प्रमाणे आहेत.

१) सेवाजेष्ठ शिक्षकांच्या सेवेचा अपमान करणारे १४ मे २०२६ चे शिक्षण संचालक पुणे यांचे पत्र रद्द करावे.
२) महाराष्ट्र शासनाने टीईटी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अथवा टीईटी परीक्षा घेण्याबाबत राज्याची स्वतंत्र भूमिका घ्यावी.
३) संच मान्यतेचा 15 मार्च 2024 चां शासन निर्णय रद्द करावा.
४) SIR व BLO काम हे प्रत्यक्ष निवडणुकीचे काम नसल्या कारणाने शिक्षकांना देण्यात येऊ नये.

या मागण्या शासना पर्यंत पोहोचविण्या करिता सामूहिक रजा अर्ज घेऊन सदर अर्ज केद्रप्रमुख यांना द्यावा शाळा 100% बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

गुरुवार 9 जुलै 2026 ला 1.00 वा. चार हुतात्मा पुतळा येथे उपस्थित रहावे. हा मोर्चा चार हुतात्मा पुतळा पासून सुरू होऊन पुनम गेट जिल्हा परिषद पर्यंत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे तेथे उपस्थित सर्व संघटना प्रमुख मार्गदर्शन करतील.

मोर्चा करीता येणाऱ्यांनी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे छत्री तसेच रेनकोट सोबत ठेवावे. पिण्याचे पाण्याची बॉटल सोबत ठेवावी आयोजक कडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्यांना शिक्षक बांधवांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे व इतर गंभीर कारणास्तव सोलापूर मोर्चा मध्ये येणे शक्य नाही त्यांनी शाळा 100% बंद ठेवून सामुहिक रजा अर्ज भरून द्यावा. सदर आंदोलनाचा विविध माध्यमावर प्रचार प्रसार करण्यात येत आहे.

मोर्चा चे समापन झाल्याशिवाय कोणीही आपली जागा सोडू नये सदर आंदोलनात महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटना सहभागी आहे तरी सर्वांनी यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे ही विनंती आयोजकां कडून करण्यात आली आहे.

चळवळ ही उदरनिर्वाह चे साधन नसून समाजातील व्यवस्था परिवर्तनाचे माध्यम आहे त्यामुळे उद्याचे भविष्य आपल्या उपस्थितीने दिसेल त्यामुळे आंदोलनात 100% सहभागी व्हा आणि सर्व सामाजिक संघटना, पालक, शिक्षण संस्था यांनीही यात सहभागी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकजुटीने काहीही शक्य करता येते, फक्त स्वतःवरील आत्मविश्वास आणि संघर्ष शेवट पर्यंत करण्याची लढाऊ वृत्ती सोडू नका असे मत सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती सोलापूर ने प्रसिद्ध केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *