प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत पालेभाज्या व पूरक आहारात वाढ करण्यात यावी अशी मागणी
गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांनी शासनाकडे केलेली आहे.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माणयोजनेत बदल करण्यात यावा याबाबतचे निवेदन संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांना देण्यात आलेले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की, इयत्ता पहिली ते पाचवी १०० ग्रॅम व इयत्ता सहावी ते आठवी १५० ग्रॅम तांदूळ दररोज शिजवावा लागतो परंतु विद्यार्थी एवढा भात खात नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे तांदळाचे प्रमाण निम्म्याने कमी करून तांदळामध्ये टाकण्यात येणाऱ्या पालेभाज्या व इतर कडधान्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पूरक आहारामध्ये वाढ करण्यात यावी. यासाठी वेगळी तरतूद करण्याची आवश्यकता नाही फक्त तांदळाचे प्रमाण कमी करून पालेभाज्या व पूरक आहार वाढवण्याची गरज आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती आहार योजनेमध्ये बदल करून ही योजना आणखी प्रभावीपणे व विद्यार्थीकेंद्रीत राबविण्यसाठी प्रयत्न करण्यात यावा.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी व यासाठी “मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना ” सुरू करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या आहे .या मागणीचे निवेदन राज्याचेशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ,शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पाठवण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत ,राज्य प्रवक्ते व पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चव्हाण, महिला आघाडीच्या नेत्या पोर्णिमा रणपिसे, सुषमा तरटे, सुजाता गायकवाड , सीमा थोरात, खेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंणगारे, हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, बारामती तालुकाध्यक्ष विनोदकुमार भिसे, इंदापूर तालुका अध्यक्ष सुहास मोरे, दौंड तालुका अध्यक्ष गोविंद जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
वरील विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की प्रधानमंत्री पोषणशक्ती आहार योजनेत प्रत्येक विद्यार्थ्याला होईल इयत्ता पहिली ते पाचवी 100 ग्रॅम व इयत्ता सहावी ते आठवी दीडशे ग्रॅम तांदूळ दररोज शिजवावा लागतो परंतु विद्यार्थी एवढा भात खात नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
त्यामुळे तांदळाचे प्रमाण निम्म्याने कमी करून तांदळामध्ये टाकण्यात येणाऱ्या पालेभाज्या व इतर कडधान्याचे प्रमाण वाढविण्यात यावे .तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पूरक आहारामध्ये वाढ करण्यात यावी. यासाठी वेगळी तरतूद करण्याची आवश्यकता नाही फक्त तांदळाचे प्रमाण कमी करून पालेभाज्या व पूरक आहार वाढवण्याची गरज आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती आहारामध्ये याप्रमाणे बदल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई मा. आयुक्त शिक्षण आयुक्तालय पुणे मा .संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे मा. संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत.

