June 3, 2026

किसन कांबळे (MCJ) सर 9970381507

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळातर्फे यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.

 

 

निकाल येथे पाहता येणार

1. https://results.digilocker.gov.in

2. https://mahahsscboard.in

3. https://sscresult.mkcl.org

4. https://results.targetpublications.org

 

5. https://results.navneet.com

 

6. https://www.tv9marathi.com

 

7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results.

 

यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ९ मे ते २३ मे २०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.

फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून-जुलै २०२७) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *