August 21, 2026

दौंड

किसन कांबळे (MCJ) सर 9970381507

जपतलाई येथील आदिवासी आश्रमशाळेतील सहा विद्यार्थीनींना सर्पदंश होऊन तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची सविस्तर चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांची मागणी महाराष्ट्र शासनाकडे निवेदन देऊन केली आहे.

जपतालाई येथील आदिवासी आश्रम शाळेतील सहा विद्यार्थिनींचा सर्पदंश होऊन तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे या घटनेची सविस्तर चौकशी करून जोशींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे केली आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यीनी जागतिक आदिवासी दिन साजरा करुन आनंदात झोपलेल्या असताना सहा मुलींना साखरझोपेत पहाटे अडीच वाजता सर्पदंश झाला. यात तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य तिघींची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

जपतलाई येथील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत ही घटना १० ऑगस्ट रोजी घडली. या दुर्दैवी घटनेतून व प्रसार माध्यमांच्या माहीतीवरून असे निर्दशनास येते की आश्रमशाळेत विद्यार्थिनींना झोपण्यास पलंगाची सुविधा नव्हती व इतर सुविधांचा अभाव दिसून येत आहे‌. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित या घटनेची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.मृत पावलेल्या मुलींच्या पालकांना प्रत्येकी एक कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी.

महाराष्ट्रातील इतर अनुदानित आश्रमशाळा, वस्तीगृहाच्या सुविधांची माहिती घेऊन शासकीय निधी उपलब्ध करून द्यावा यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत व राज्य सल्लागार दिगंबर काळे व राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबेउपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *