August 26, 2026

मुंबई

किसन कांबळे (MCJ) सर 9970381507

नशा मुक्त जनजागृती अभियान सामुहिक शपथ कार्यक्रम मुंबई वरळी येथील NSCI Dom येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे होते. तसेच माननीय मंत्री मंगल प्रभात जी लोढा कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र राज्य हे होते.

तसेच या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून देवेन भारती पोलीस आयुक्त मुंबई, श्रीमती अश्विनी जी भिडे आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका, श्रीमती आँचल गोयल जी जिल्हाधिकारी मुंबई शहर, सौरभ कटियार जिल्हाधिकारी मुंबई उपनगर (सदस्य सचिव) तसेच श्रीमती सपना श्रॉफ राजचंद्र दिवाइनटच होते.

यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नशा मुक्त मुंबई ची शपथ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना साक्षी ठेऊन देण्यात आली.

माननीय मंत्री मंगलप्रभात जी लोढा यांनी नशा मुक्त मुंबई करण्याचा निर्धार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने करण्याचा निर्धार केला.

आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचा मुजरा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून केली.

त्याचे कोणत्याही विषयावरील भाषण ही अभ्यासपूर्ण आणि प्रभावी असते. देवा भाऊ नी बोलताना नमूद केले की भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नशा मुक्त भारत अभियान या संकल्पनेला सत्यात उतरविण्यासाठी याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे आणि हे लोक सहभागातून शक्य आहे. अवघड आहे पण अशक्य नाही तसेच भारत हा देश तरुणांचा देश आहे. शत्रू राष्ट्रांना माहिती आहे की आपण भारताला युद्धात हरवू शकत नाही त्यासाठी त्यांनी आपल्या भारत देशातील तरुण पिढीला नशेच्या गर्तेत लोटण्यासाठी विविध मार्गाने युवकांना मादक पदार्थांच्या ड्रग्स च्या माध्यमातून आपल्या देशाला पोखरण्याचे काम सुरू आहे त्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने पुढाकार घेऊन याला जनआंदोलन करण्याचा निर्धार केला आहे आणि त्याचा शुभारंभ लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नशा मुक्त मुंबई करणार या गरजनेने करण्यात आला.त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या सोलापूर जिल्ह्यात अतिशय प्रभावीपणे नशा मुक्त भारत अभियान चे सोलापूर जिल्हाचे समाज कल्याण विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य हे उपस्थित होते.

नशा मुक्त भारत अभियान सोबतच ते सशक्त भारत अभियान देखील प्रभावीपणे राबवित आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात व्यापक पद्धतीने प्रचार आणि प्रसार ते करत आहेत.

त्यांनी वरळी येथील NSCI Dom परिसरात असंख्य विद्यार्थी पालक तसेच होमगार्ड आणि उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले.  त्यांना यावेळी कॉलेजचे प्राध्यापक मुकेश कनोजिया सर यांचे सहकार्य लाभले.

देशातील युवक तसेच समाज नशा मुक्त आणि सशक्त राहिला तर एक सशक्त राष्ट्र निर्माण होईल त्यासाठी पहिली पासून ते बारावी पर्यंत हा जो 12 वर्षाचा मुला मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो त्यावर जास्तीत जास्त काम करणे त्यांना चांगले संस्कार ,चांगले शिक्षण आणि सशक्त शरीर म्हणजेच व्यायामाची आवड निर्माण करणे या वयातच शक्य असते असे मार्गदर्शन महेश वैद्य यांनी उपस्थितांना केले.

नशा ही समाजाला लागलेली किड आहे आणि ती कीड काढायची असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी निवेदन करताना महेश वैद्य यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केली आहे की नशा मुक्त अभियाना सोबतच सशक्त अभियान राबविण्यात यावे ही काळाची गरज आहे कारण ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळा हायस्कूल कॉलेज आणि ग्रामीण भागात व्यायामाचे प्रति अतिशय नगण्य स्थान आहे.

शाळा हायस्कूल कॉलेज मधील विद्यार्थीनीं व विद्यार्थ्यांना व्यायाम हा दुरापास्त झाला आहे यावर खूप काम करणे गरजेचे आहे.  तसेच नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान ही एक महत्वाची दैनंदिन मानवी जीवनाशी निगडित आहे.

त्याच्या प्रभावी आणि कठोर कारवाई साठी नशा मुक्त भारत आणि सशक्त भारत अभियान यांचे स्वतंत्र मंत्रालय किंवा महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्यासाठी आपण ग्रासरूट आराखडा बनविला आहे आणि खात्री आहे की त्याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होईल त्यासाठी एक कल्पक नेतृत्व असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याचा नक्कीच विचार करतील असा ठाम विश्वास महेश वैद्य यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच यावेळी सेवा देत असलेले होमगार्ड प्रमुख प्रफुल मोरे यांनी मुंबई शहरातील सर्व होमगार्ड बंधूंना आपण मार्गदर्शन करावे असे सूचित केले.

मुंबई शहरातील काही हायस्कूल आणि कॉलेज यांनी पण आपल्यासोबत संपर्क केला आहे आणि मला नक्कीच थोडे फार योगदान देता आले तर हे माझे भाग्य असेल आणि भविष्यात मुंबईसाठी नशा मुक्त मुंबई आणि सशक्त मुंबईसाठी नक्कीच झोकून काम करू असा विश्वास महेश वैद्य यांनी यावेळी व्यक्त केला.

देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून होत असलेले नशा मुक्त भारत आणि सशक्त भारत अभियानांतर्गत काम करण्याची संधी मिळते त्याचे खूप समाधान वाटते छोटीशी खारीची भूमिका घेत आहोत याचे समाधान वाटते.

व्यायाम क्षेत्रातील गेली 28 वर्षाचा अनुभव पाठीशी आहे आणि ईश्वर आपल्याकडून चांगले काम करून घेईल अशी आशा आहे माझी प्रेरणा माझी आई आहे अशी भावना महेश वैद्य यांनी व्यक्त केली.

आतापर्यंत ज्यांनी सहकार्य केले आमचे मित्र समाजसेवक किसन कांबळे सर, पत्रकार बंधू , सूर्यकांत होनप जी, अशपाक भाई ,अलीम भाई तसेच कबीर भाई तसेच पत्रकार सुनील सूर्यपुजारी , तसेच नरेंद्र भाऊ ठाकूर सचिन झवेरी . चित्रपट क्षेत्रातील लिजेंड लेखक, निर्देशक शक्तिमान जी तलवार, तसेच पद्मश्री भजन सम्राट अनुप जलोटा जी तसेच लोकप्रिय अभिनेता सनी देओल जी यांचे सहकार्य लाभले त्यांचे आभार महेश वैदय यांनी मानले.

मोठे उद्योजक रिलायन्स इंडस्ट्री चे समीर जी साठा सर यांचे खूप सहकार्य मिळते. तसेच उद्योजक मित्र बाळासाहेब होशिंग तसेच महेश दोशी, विलास भोसले तसेच प्रताप कांबळे, अभिजित कांबळे तसेच  हितचिंतक आणि मार्गदर्शक संजय अण्णा मोरे, गुरुवर्य विनोद कुमार गांधी सचिन सरदेसाई आणि सतत तळमळीने सहकार्य करणारे आणि दिशा दाखवणारे हरीश जी मणियाल हे आहेत. व्यायाम क्षेत्रातील गेली 28 वर्षाचा अनुभव पाठीशी आहे आणि ईश्वर आपल्याकडून चांगले काम करून घेईल अशी आशा आहे माझी प्रेरणा माझी आई आहे अशी भावना महेश वैद्य यांनी व्यक्त केली.

मुंबई शहरातील नामांकित कॉलेजेस हायस्कूल तसेच शिक्षक वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *