April 14, 2026

जेऊर

सागर साखरे सर

प्रा. संजयकुमार रंगनाथ राजेघोरपडे यांना पुरातत्व शोध संस्थान, बालाघाट मध्यप्रदेश येथे मानद डॉक्टरेट पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.

समाजकार्य, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली आहे. बालाघाट ,मध्यप्रदेश या ठिकाणी 16 राज्यातील एकशे पंधरा मान्यवरांना त्यांच्या आरोग्य, शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले आहे.

डॉ संजयकुमार राजेघोरपडे सर यांना वर उल्लेखित कार्याबद्दल डॉक्टरेट पदवी राष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या शुभहस्ते डिग्री प्रमाणपत्र, ट्रॉफी, देऊन यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला आहे, सोलापूर जिल्ह्यातून तीन मान्यवरांना डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली आहे

या कार्यक्रमा वेळी झालेल्या स्वरचित कविता लेखन वाचन स्पर्धेत डॉ. संजयकुमार राजेघोरपडे सर यांनी स्वरचीत व लिखित राष्ट्रभक्तीपर हिन्दी कवितेचे वाचन केले त्यावेळी त्यांचा प्रथम क्रमांक आल्याची माहिती सागर नाना साखरे सर यांनी दिली.

माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत , पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य संघटक विष्णुपंत आंदळकर , मागासवर्गीय शिक्षक संघटना राज्य अध्यक्ष शामराव जवंजाळ सर, संदेश चे संपादक ॲड. डॉ. बाबूराव हिरडे , भारत आणि महाराष्ट्र क्रिकेट परीक्षक दत्ता विघावे शिवस्वराज्य संस्थेचे संजय वाघमारे केम केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख महेश कांबळे , माजी प्राचार्य जयप्रकाश बिले सर, गोवर्धन चौरे सर, प्रा. अभिमन्यू माने सर, पोलीस मित्र मार्गदर्शक अतुल घाडगे, पोलीस मित्र संघटना जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव, यशकल्याणीचे सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील सर, लक्ष्मण लष्कर सर, यशवंत परिवार, योद्धा करियर अकॅडमी, स्वराज्य अकॅडमी, ज्यांनी अनेक राज्यातील किल्ले स्वच्छता मोहीम यशस्वी केली असे छत्रपती शासन चे राष्ट्रीय अध्यक्ष प्राणजीत गवंडी, उस्मानाबाद , शेतकी अधिकारी दीपक खटके तांबवे , उन्मेष कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई राजमाने- नष्टे, करमाळा नगर परिषद चे माजी उपनगराध्यक्ष मुकूंद कांबळे , करमाळा शहरातील नामांकित उदयोजक श्रेणीक खाटेर, काडवान चे लेखक प्रकाश तात्या लावंड , बहुजन संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ कदम अरोग्य मार्गदर्शक अतुल घाडगे, ॲड योगिता सावंत मुंबई उच्च न्यायालय यांनी अभिनंदन केले आहे.

डॉ संजयकुमार राजेघोरपडे यांनी हिन्दी विषयावरील कविता संग्रह प्रकाशन सोहळा होणार असल्याची माहिती कविवर्य प्रकाश तात्या लावंड यांनी दिली आहे.

मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे सत्कार सन्मान सोहळा सोलापूर येथे होणार असल्याची माहिती जोशाबा शिक्षक पतसंस्थेचे संचालक किसन कांबळे सर यांनी देऊन डॉ. संजयकुमार राजेघोरपडे सर यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ संजयकुमार राजेघोरपडे सर यांचे करमाळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, शिष्य, आजी – माजी विद्यार्थी , आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, अश्या सर्व स्तरातून कौतूक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *