महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे चे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर १, सहावी ते आठवीसाठी पेपर २ या पद्धतीने परीक्षा घेतली जाते. त्यानुसार २१ जून रोजी सकाळी साडेदहा ते एक या वेळेत पेपर १, तर दुपारी २.३० ते पाच या वेळेत पेपर २ची परीक्षा घेतली जाणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, अन्य माहिती परीक्षा परिषदेच्या https://mscepune.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशासकीय अडचणींमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.

वाढते वय आणि त्यामुळे कमी होणारी स्मरणशक्ती , कौटुंबिक प्रश्न , मुलांमुलींचे शिक्षण – नौकरी – लग्न , BP शुगर सारखे उद्भवलेले आजार यातून बाहेर पडून दैनंदिन शैक्षणिक कामे आणि अशैक्षणिक कामांचा बोजा सहन करत TET परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या व पास होण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींनी ताणतणाव विरहीत परीक्षा द्यावी असे आवाहन किसन कांबळे सर जिल्हा उपाध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना सोलापूर तथा संचालक जोशाबा शिक्षक पतसंस्था सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्र संपर्क क्र. 9970381507 यांनी केले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णया विरोधात कायदेशीर लढा लढण्यासाठी आपणास तयार रहावे लागेल असेही मत पुढे त्यांनी व्यक्त केले.