April 13, 2026

प्राथमिक व माध्यमिक शाळां मध्ये नौकरी करण्यास उत्सुक असलेले सर्व स्तरातील शिक्षक बंधू भगिनी यांच्याकरिता CTET ची परीक्षा म्हणजे भारत सरकारच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेली होती त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

 

यामध्ये कही खुशी कही गम पहायला मिळत आहे. 

निकाल पहाण्यासाठी click करा

https://cbseresults.nic.in/CtetFeb26ii/CtetFeb26iix.htm

भारता मध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी  ही अत्यंत महत्त्वाची पात्रता परीक्षा मानली जाते. ही परीक्षा मार्फत वर्षातून दोन वेळा घेतली जाते.

CTET परीक्षेद्वारे इयत्ता 1 ते 8 पर्यंत शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता निश्चित केली जाते. या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. पहिला पेपर इयत्ता 1 ते 5 साठी (Primary Level) तर दुसरा पेपर इयत्ता 6 ते 8 साठी (Upper Primary Level) घेतला जातो. उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार एक किंवा दोन्ही पेपर देण्याची संधी असते.

परीक्षेचा पॅटर्न पूर्णपणे बहुपर्यायी प्रश्नांवर (MCQ) आधारित असून प्रत्येक पेपरमध्ये 150 प्रश्न असतात. विशेष म्हणजे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. परीक्षेसाठी साधारणपणे 2.5 तासांचा कालावधी दिला जातो.

शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, प्राथमिक स्तरासाठी 12वी उत्तीर्ण तसेच D.Ed किंवा D.El.Ed आवश्यक आहे. तर उच्च प्राथमिक स्तरासाठी पदवीसह B.Ed आवश्यक आहे.

  • CTET परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना केंद्र सरकारच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरीसाठी अर्ज करता येतो. यामध्ये आणि यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचा समावेश होतो. विशेष म्हणजे CTET प्रमाणपत्राला आयुष्यभर वैधता देण्यात आली आहे.

शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी CTET ही एक सुवर्णसंधी मानली जाते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *