June 3, 2026

दौंड

किसन कांबळे (MCJ) सर 9970381507

प्राथमिक शिक्षकांना जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्याचे काम असल्याने इयत्ता २ री, ३ री व ४ थी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण जुलै -ऑगस्ट २०२६ या महिन्यात घेण्यात यावे अशी मागणी गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांनी शासनाकडे केली आहे.

नवीन अभ्यासक्रमाची प्रशिक्षण जुलै ऑगस्ट महिन्यात घेण्यात यावे याबाबतची निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब व संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांना पाठविण्यात आले आहे .याविषयी अधिक माहिती देताना गौतम कांबळे म्हणाले की ,संदर्भ:- जा.क्र. E:२७६४८०३/अविवि/SE/२०२६/दिनांक- ०९/०४/२०२६शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र कुमठेकर मार्ग, ७०८ सदाशिव पेठ, पुणे ४११०३० यांनी प्रशिक्षणाचे आदेश दिलेले आहेत .परंतु १ मे २०२६ ते २६ जून २०२६ पर्यंत प्राथमिक शिक्षक हे जनगणना राष्ट्रीय कर्तव्यावर आहेत.

याच कालावधीत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (SCERT )मार्फत ११ मे पासून ते ३० मे पर्यंत इयत्ता २ री ,३ री व ४ थी (प्रत्येक इयत्ता निहाय ३ दिवसांचे)नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

परंतु जनगणनेचे काम असल्यामुळे अनेक शिक्षकांना प्रशिक्षणाला उपस्थित राहता येणार नाही तसेच भौगोलिक वातावरण मे महिना अतिशय कडक उन्हाळ्याचा असतो व सोबत जनगणना पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण, प्रत्यक्ष प्रगणकाला नेमणूक केलेल्या गावांमध्ये घरगणनेचे प्रत्यक्ष कामे करावे लागणार आहेत.कित्येक शाळांमध्ये सर्वच शिक्षकांना जणगणना आदेश देण्यात आले आहेत.या कालावधीत राष्ट्रीय कर्तव्यावर असताना वरील संदर्भान्वये प्राथमिक शिक्षकांचे नविन अभ्यासक्रम प्रशिक्षण आयोजित करणे योग्य होणार नाही.

एकाच वेळी दोन्ही ठिकाणी उपस्थित राहणे शिक्षकांना शक्य होणार नाही .त्यामुळे नविन अभ्यासक्रम प्रशिक्षण मे महिन्याऐवजी जुलै किंवा ऑगस्ट २०२६ मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर व जणगणेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आयोजित करावे.

जर नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण या कालावधीत घ्यायचे असेल तर सर्व प्राथमिक शिक्षकांचे जणगणना आदेश रद्द करून इतर प्रशासकीय व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. या निवेदनाच्या प्रती मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा .आयुक्त शिक्षण आयुक्तालय पुणे मा .संचालकसाहेब, (प्राथमिक) शिक्षण संचालनालय पुणे . मा .संचालक माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे दौंडचे आमदार आदरणीय मा. राहुल दादा कुल यांना पाठवण्यात आले आहे.

यावेळी संघटनेचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत, कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे व ज्येष्ठ उपाध्यक्ष व राज्य प्रवक्ते विनोद चव्हाण उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *