” रापचिकी चिकी बूम ” या फिल्म चे प्रसिद्ध लेखक आणि निर्देशक श्री रास म पुष्कर जी प्रोडक्शन हेड त्यांच्या पत्नी ज्योती पुष्कर जी. माझ्या नवऱ्याची बायको सुप्रसिद्ध मालिका फेम सोनल जी संगेकर आणि अनिता जी तुंगा मॅडम यांच्या सोबत नशा मुक्त भारत चे सोलापूर जिल्हा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर महेश वैदय यांची बैठक नुकतीच झाली त्याबद्दल बोलताना महेे वैदय यांनी ही माहिती सांगितली.
पुढे बोलताना महेश वैदय यांनी सांगितले की vfx जगतातील मोठे नाव असलेली व्यक्ती मानस जी साहू यांच्या रिडेलमंक स्टुडिओत पार पडली.
रिलायन्स इंडस्ट्रीज चे समीर जी साठा यांचे सूचने नुसार ही मराठी फिल्म ची मीटिंग पार पडली असे महेश वैद्य यांनी सांगितले. महेश वैद्य हे समीर जी साठा यांचे गेली 26 वर्षा पासून फिटनेस कोच आहेत.
त्यामुळे त्यांचे नाते खूप वेगळ्या पद्धतीचे म्हणजे एक कौटुंबिक आहे. समीर जी ही महेश वैद्य यांना लहान भाऊ मानतात.
समीर जी यांनी महेश वैैैदय यांना त्यांच्या पडत्या काळात खूप सहकार्य केले आहे.
या मराठी चित्रपटाची कहाणी रासम पुष्कर यांची आहे ही कहाणी माय लेकरांच्या स्वप्नांची आहे. अतिशय वेगळा विषय मांडला आहे. सोनल जी संगेकर आणि अनिता तुंगा मॅडम यांच्या माध्यमातून रासम पुष्कर जी यांचा परिचय झाला. ते अतिशय प्रतिभावान लेखाक निर्देशक आहेत. त्यांनी हिंदी सावधान इंडिया आणि इतर हिंदी मालिका , आणि सध्या इंद्रायणी मालिकेचे दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांचे सोबत एक मराठी मालिका घेऊन येत आहेत.. ही कहाणी वेगळ्या धाटणीतील असल्यामुळे मनाला भावते त्यामुळे समीर जी ना ते कहाणी पाठवली आणि त्यांच्या सूचनेनुसार पुढील टप्पा पूर्ण केला जाईल ..असे नशा मुक्त भारत आणि सशक्त , सक्षम भारत अभियान चे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी सांगितले…

